धुळे - शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथील २२ वर्षीय युवकाचा गणपती विसर्जन करताना तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. अंकित चतूर पाटील (वय, २२ वर्ष) असे मृत तरूणाचे नाव आहे.
धुळ्यात गणपती विसर्जन करताना तरुणाचा बुडून मृत्यू - गणपती विसर्जन करताना तरुणाचा बुडून मृत्यू
शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथील २२ वर्षीय युवकाचा गणपती विसर्जन करताना तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. अंकित चतूर पाटील (वय, २२ वर्ष) असे मृत तरूणाचे नाव आहे.
मृत अंकित चतूर पाटील
हेही वाचा - 28 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाविरुद्ध धुळ्यात गुन्हा दाखल
अंकित हा अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात बीसीएच्या(बॅचलर इन कॉम्प्युटर अॅप्लीकेशन) दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. गणपती विसर्जन करण्यासाठी गेला असता, अमळनेरच्या धार पाझर तलावात बुडून त्याचा मृत्यू झाला.