धुळे- शहरातील जय हिंद जलतरण तलावात बुडून एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
जलतरण तलावात बुडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू - जलतरण तलाव
शहरातील जलतरण तलावात पोहतांना हृदयविकाराचा झटका आल्याने, एका 19 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.
swimmer died in dhule
धुळे शहरातील सुभाष नगर परिसरातील नितीन सातभाई यांचा मुलगा व्यंकटेश नितीन सातभाई याचा जयहिंद जलतरण तलावात पोहतांनाच मृत्यू झाला. व्यंकटेश हा नुकताच बारावी ऊत्तीर्ण झाला होता. तलावात पोहतांना त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. व्यंकटेशच्या मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.