महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली 109 वर

वाडी-शेवाळे येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आज (रविवार) त्या रुग्णाचा धुळे हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे.

109 corona positive cases in dhule district
धुळ्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली 109 वर

By

Published : May 24, 2020, 8:40 PM IST

धुळे- जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाडी-शेवाळे येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आज (रविवार) त्या रुग्णाचा धुळे हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. धुळ्यात कोरोनाबाधितांची संख्या ही 109 वर पोहोचली आहे.

मृत्यू झालेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचे वय 67 होते. आतापर्यंत जिल्ह्यातील १२ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर शहरातील गल्ली क्रमांक 4 मधील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 109 झाली आहे. यात शहरातील 82 जणांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details