चंद्रपूर- शहरातील लालपेठ परिसरात युवकाचा खून झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. संजय झुणमूलवार असे मृत युवकाचे नाव आहे. मृत व आरोपी हे एकाच परिसरात राहत असल्याने हत्येचे कारण काही जुना वाद असावा, असे बोलले जात आहे.
चंद्रपूरमधील लालपेठ परिसरात युवकाची हत्या, आरोपींचे आत्मसमर्पण
चंद्रपूरमधील लालपेठ परिसरात सोमवारी मध्यरात्री संजय झुणमूलवार या युवकाची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणातील ४ आरोपींनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले, अशी माहिती समोर आली आहे.
चंद्रपूरमधील लालपेठ परिसरात युवकाची हत्या
चंद्रपूर शहरातील लालपेठ परिसरात सोमवारी मध्यरात्री संजय झुणमूलवार या युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणातील ४ आरोपींनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले, अशी माहिती समोर आली आहे. पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.