महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपुरात महिला काँग्रेसकडून 'मेरा पोशाख मेरा अधिकार' आंदोलन - चंद्रपुरात महिला काँग्रेसचे आंदोलन

कर्नाटक येथे हिजाबशी संबंधित वाद सुरू आहे. या विरोधात आज महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्यावतीने चंद्रपुरात आंदोलन करण्यात आले. यावेळी हिजाबबंदीवरून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.

womens congress protest
चंद्रपुरात काँग्रेसचे आंदोलन

By

Published : Feb 12, 2022, 9:33 PM IST

Updated : Feb 12, 2022, 9:51 PM IST

चंद्रपूर - कर्नाटक येथे हिजाबशी संबंधित वाद सुरू आहे. या विरोधात आज महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्यावतीने चंद्रपुरात आंदोलन करण्यात आले. यात मुस्लिम मुलींनी सहभाग नोंदवला.

कर्नाटकमधील शिक्षण संस्थेचा वाद मागच्या चार महिन्यापासून सुरू होता. पण, नेमकी उत्तर प्रदेशची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हा वाद उकरून काढला आहे का? लहानपणापासून आपण बघतोय की सर्व धर्माचे मुले शाळेत शिकतात, पण या आधी असे प्रकार घडले नाहीत. आता ज्या पद्धतीने या घटना देशात घडत आहेत, त्यामुळे बहुसंख्यकांना अल्पसंख्याकांवर जरब बसवायची आहे की काय? असा संशय येतोय, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी भाजपावर केला.

चंद्रपुरात महिला काँग्रेसचे आंदोलन

मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब घालून या आंदोलनात सहभाग घेतला व 'लडकी हू लड सकती हूं', 'मेरा लिबास मेरा अधिकार' या घोषणा देऊन कर्नाटक भाजप सरकारचा निषेध केला.

काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती -

या आंदोलनाला अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, सामाजिक कार्यकर्ते मतीन कुरेशी, उपाध्यक्षा सुनीता धोटे, सेवा फाउंडेशन काँग्रेसच्या शहर अध्यक्षा शितल कातकर, महिला सेवादलच्या शहर अध्यक्षा लता बारापात्रे, उपाध्यक्षा परवीन सय्यद, नगरसेवक अमजद अली, सकिना अन्सारी, विणा खनके, मुन्नी मुमताज शेख, शमशाद बेगम, शफिया शेख, मंगला शिवरकर, समिस्ता फारुकी, वाणी डारला, चंदा वैरागडे, संगिता मित्तल, नेहा मेश्राम, पुष्पा नगरकर, मून्ना तावाडे, नरेंद्र डोंगरे, शहर सचिव हाजी अली, बापू अन्सारी, नाहीद काझी, मोबिन सय्यद, साजिद अली, ऐजाज कुरेशी, बबलू कुरेशी, महेश जिटे, इरफान शेख, किरण वानखेडे यांच्यासह किदवाई शाळेच्या शिक्षिका व विद्यार्थिनींनी आणि बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

Last Updated : Feb 12, 2022, 9:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details