महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजुऱ्यात महिलेची आत्महत्या; दोन दिवसांपासून होती बेपत्ता - काजल अशोक नव्कलवार

बुधवारला सकाळी ९ वाजेच्या सुमारास नागरिकांना नगर परिषद परिसरातील टेबी दर्ग्याजवळील तलावात एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसून आला होता. याबात राजुरा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला आहे.

women suicide rajura
आत्महत्या केलेल्या महिलेचे दृश्य

By

Published : Mar 18, 2020, 8:26 PM IST

चंद्रपूर- राजूरा येथील टेबी दर्ग्याजवळील तलावात एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. काजल अशोक नव्कलवार, असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, राजुरा शहरातील रमानगर येथील काजल नव्कलवार या दोन दिवसापूर्वी खरेदी करण्यासाठी बाजारात जाते, असे सांगून घराबाहेर पडल्या होत्या. मात्र, दोन दिवस उलटूनही त्या घरी परतल्या नाहीत. कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध केली, मात्र त्यांचा सुगावा लागला नाही. त्यामुळे, काजल यांच्या पतीने राजुरा पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास नागरिकांना नगर परिषद परिसरातील टेबी दर्ग्याजवळील तलावात एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसून आला. याबाबत राजुरा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी पुढील तपास केला जात आहे.

हेही वाचा-कोरोना इफेक्ट : रास्त भाव दुकानात ग्राहकाना करावा लागणार नाही अंगठा

ABOUT THE AUTHOR

...view details