चंद्रपूर- वीज पडून एका विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना वरोरा तालुक्यातील शेगाव येथे आज संध्याकाळच्या सुमारास घडली.
वीज पडून महिला ठार, वरोरा येथील घटना - वीज
शेतातील काम आटोपून महिला परत येत असताना तिच्या अंगावर विज पडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
मृत मंगला राजू कामडी
शेगाव येथील मंगला राजू कामडी ही महिला एका शेतात मजुरीने गेली होती. संध्याकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शेतातील काम आटोपून महिला परत येत असताना तिच्या अंगावर विज पडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
मृत महिलेच्या पतीचे निधन झालेले आहे. महिलेच्या मागे दोन मुली आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.