महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू, सावली तालुक्याच्या रैयतवारीतील घटना - सावली

धान कापणीसाठी गेलेल्या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना रैयतवारी (ता. सावली) येथे घडली.

प्रातिनिधीक छायाचित्र

By

Published : Nov 25, 2019, 3:15 PM IST

चंद्रपूर- सावली तालुक्यातील रैयतवारी येथे धान कापणीसाठी गेलेल्या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली. शीला पुरुषोत्तम वासेकर (वय 35 वर्षे) असे या महिलेचे नाव आहे.


सध्या शेतीमधील धान कापणे व बांधण्याची कामे जोरात सुरू आहेत. नेहमीप्रमाणे रैय्यतवारी गावातील महिला धान कापणीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी शीला वासेकर या सुद्धा गावापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या स्वतःच्याच शेतातील धान कापणी करत होत्या. यावेळी दुपारी पाउणे दोन वाजण्याच्या सुमारास काहीतरी चावल्याचा भास झाला. नंतर सविस्तर पाहणी केली असता त्यांना सर्पदंश झाल्याचे आढळून आले. त्यांना लागलीच उपचाराकरता आणल्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. मृत शीला वासेकर यांच्या पश्चात दोन लहान मुले आहेत.

हेही वाचा - अखेर विजपुरवठा सूरु; सिंचनाची समस्या सूटली

ABOUT THE AUTHOR

...view details