चंद्रपुरात अनैतिक संबंधाच्या संशयातून थरार; पतीवर कुऱ्हाडीने हल्ला करुन पत्नीची नदीत उडी - कुऱ्हाड
चंद्रपुरात अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा पतीवर कुऱ्हाडीने हल्ला
2019-06-06 10:59:08
पतीचे नाव बबन सोयाम, तर हल्ला करणा-या पत्नीचे नाव अर्चना सोयाम आहे.
चंद्रपूर- जिल्ह्यातील घुग्घुस येथील नकोडा येथे थरकाप उडवणारी घटना घडली. अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीने पतीवर कुऱ्हाडीने हल्ला केला आहे. यानंतर तिने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. पतीचे नाव बबन सोयाम असून हल्ला करणाऱ्या पत्नीचे नाव अर्चना सोयाम असे आहे.
आज (गुरुवार) पहाटे ही घटना घडली. पतीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Last Updated : Jun 6, 2019, 12:22 PM IST