चंद्रपूर - जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी, असे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. मात्र, असे असातनाही चिमूर तालुक्यातील नेरी येथील बाजारात सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून ग्राहकांनी गर्दी केली. प्रशासनाच्या या बेजबादारीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणखीनच वाढेले अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
चिमूर तालुक्यातील नेरी हे जवळपास अठरा ते वीस हजार लोकसंख्येचे मोठे गाव असून याठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. येथे परिसरातील अनेक खेडेगावातील नागरिक विविध प्रकारची खरेदी करण्यासाठी येतात. नेरीमध्ये दैनंदिन भाजीपाल्याचा बाजार भरतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले. तसे आदेश सर्व ग्रामपंचायत व पोलीस प्रशासणाला देण्यात आले आहेत. मात्र, नेरी येथील दर बुधवारी भरणारा आठवडी बाजार मागील आठवड्यातही भरला. तसेच आज (गुरुवारीही) दणक्यात भरला.