चंद्रपूर- जिल्ह्यात आज अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. तसेच चंद्रपूर शहराजवळील इरई धरण 94 टक्के भरले असून धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे प्रशसानाकडून नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
चंद्रपुरात अतिवृष्टीचा हवामान खात्याचा अंदाज; जिल्हा प्रशासनाने दिला अतिदक्षतेचा इशारा
हवामान खात्याने 5 दिवसाचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तवले आहे.
हवामान खात्याने 5 दिवसाचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तविले आहे. चंद्रपूर शहराजवळील इरई धरणातील जलसाठा वाढत असून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे इरई नदी शेजारील गावातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज आहे. मात्र धोक्याची परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ जिल्हा आपत्ती निवारण कक्षाला 1077 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन, जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी जितेश सुरवाडे यांनी केले आहे.