चंद्रपूर - भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी 2014 च्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी स्थापन करण्यासाठी प्रयत्न झाले होते, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. याला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दुजोरा दिला आहे. महाविकास आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, पुढे याचे काहीही होऊ शकले नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.
'होय..! २०१४ ला महाविकास आघाडीच्या स्थापनेसाठी प्रयत्न झाला होता' - महाविकास आघाडी स्थापना 2014 विजय वडेट्टीवार
आताचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी २०१४ मध्ये विरोधी पक्षनेते पदाची शपथ घेतली होती. तसेच भाजपला बहुमत नव्हते. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मिळून महाविकास आघाडी तयार करावी, अशी चर्चा झाली होती, असे वडेट्टीवार म्हणाले.
विजय वडेट्टीवार
आताचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी २०१४ मध्ये विरोधी पक्षनेते पदाची शपथ घेतली होती. तसेच भाजपला बहुमत नव्हते. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मिळून महाविकास आघाडी तयार करावी, अशी चर्चा झाली होती. मात्र, काँग्रेसची भूमिका या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि हायकमांड ठरवते. महाविकास आघाडी तयार व्हावी, अशी अनेकांची इच्छा होती. मात्र, यापुढे काही ठोस निर्णय होऊ शकला नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.