महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इंदिरा गांधींचा जयजयकार होतो तर मोदींचा का नको - राजनाथ सिंह - pm modi

'बालाकोट हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तान भयग्रस्त झाला. पण भारतातील काही लोक चिंताग्रस्त झालेत, याचे आश्चर्य वाटते. भारतीय वायूसेनेच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत किती दहशतवादी मारले, असे विचारत आहेत. पण, वीर मृतदेह मोजत नाहीत, ते काम गिधाडांचे आहे,' असे राजनाथ म्हणाले.

राजनाथ सिंह

By

Published : Apr 10, 2019, 9:42 AM IST

चंद्रपूर - इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करीत बांग्लादेश निर्माण केला. त्यांचा संपूर्ण देशभरात जयजयकार करण्यात आला. अटलबिहारी वाजपेयी यांनी सुद्धा त्यांची मुक्तकंठाने स्तुती केली. आज नरेंद्र मोदी यांनी थेट पाकिस्तानमध्ये सैन्य घूसवून हल्ला केला, मग हे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाही का? जर इंदिरा गांधींचा जयजयकार होतो तर मोदींचा का नाही, असा सवाल राजनाथ सिंह यांनी उपस्थित केला.

राजनाथ सिंग

ते चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील बल्लारपूर येथे सभेला संबोधित करीत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे उमेदवार हंसराज अहिर तसेच युतीतील पदाधिकारी उपस्थित होते. हंसराज अहिर इतकी सभ्य आणि शालीन व्यक्ती मी पाहिला नाही. मात्र, गृहराज्यमंत्री असताना त्यांची कर्तव्यदक्षता आणि कठोर निर्णय घेण्याची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. यामुळेच मी येथे मुद्दाम आलो आहे, असेही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

यावेळी सिंह यांनी भाजपने जाहीर केलेल्या घोषणपत्राची वाच्यता केली. आम्ही छोटे व्यापारी आणि ज्येष्ठ शेतकऱ्यांना पेन्शन देऊ, १ लाखापर्यंतच्या कर्जाला पाच वर्षापर्यंत कुठल्याही प्रकारचे व्याज लागणार नाही, याचीही चर्चा त्यांनी केली. 'बालाकोट हवाई हल्ल्याच्या वेळी पाकिस्तानमधील निर्दोष नागरिकांना इजा पोहोचणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. केवळ जैशच्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्राला लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तान त्यामुळे भयग्रस्त झाला. आम्ही जम्मू काश्मिरातील फुटीरतावाद्यांना कठोर संदेश दिला आहे. पण भारतातील काही लोक चिंताग्रस्त झालेत, याचे आश्चर्य वाटते. एकीकडे देशाची सेना उत्तम कार्य करीत आहे. आता विरोधक भारतीय वायूसेनेच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. किती दहशतवादी मारले, असा प्रश्न विचारत आहेत. पण, वीर कधीही मृतदेह मोजण्याचे काम करीत नाहीत, ते काम गिधाडांचे आहे, ' अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढविला.

ABOUT THE AUTHOR

...view details