चंद्रपूर - विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. अनेक नद्यानाले तुडूंब भरुन वाहत आहेत. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वर्धा नदीला महापूर आला ( Wardha river flood in Chandrapur ) आहे. चंद्रपूर जिल्हा आता पुराच्या विळख्यात सापडला ( Chandrapur Flood ) आहे. जिल्ह्यातील अनेक मुख्य मार्ग बंद झाले आहेत. यवतमाळ - चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
सर्वदूर मुसळधार, अनेक नद्यांना पूर - वर्धा, वैनगंगा, उमा, इरई नदीला आलेल्या महापुराचा फटका जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना बसला आहे. अनेक गावांना पुराने वेढा दिला. दोन हजारचा आसपास नागरिकांना सूरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या पुराचा फटका पाळीव जनावरांनाही बसला आहे. इरई, अप्पर वर्धा, बगोसे खुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सूरूच आहे. वर्धा, वैनगंगा, इरई नदी धोधो वाहत आहेत. नदीचा पुराने अनेक गावाला वेढा दिला. माजरी, बेलसनी गावात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरले आहे. दोन हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी प्रशासनाने हलविले. अद्यापही कार्य सूरूच आहे.