चंद्रपूर-निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी परिसराला बसला आहे. चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका 9 जिल्ह्यांना बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.शनिवारपासून ते स्वतः या भागाचा दौरा करून नुकसानाची पाहणी करणार आहेत.
निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यातील 15 जिल्ह्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामध्ये रायगड, नाशिक, पुणे, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील भागांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.वडेट्टीवार यांनी या सर्व भागात एकूण किती नुकसान झाले आहे, याचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.