चंद्रपुर -जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी वंचित बहुजन आघाडीकडून तीन विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे. यात चिमूर, वरोरा आणि ब्रम्हपुरी या मतदारसंघांचा समावेश आहे.
हेही वाचा... चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ : राष्ट्रवादीची लागणार कसोटी तर भाजपत इच्छुकांची भाऊगर्दी
चिमूर विधानसभेसाठी अरविंद सांधेकर यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. तर भद्रावती-वरोरा विधानसभेसाठी अॅ्ड. अमोल बावणे आणि ब्रम्हपुरीसाठी अॅड. चंदनलाल मेश्राम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार जाहीर हेही वाचा... चंद्रपूर: शिवसेनेची जिल्ह्यातील तीन विधानसभा जागांवर दावेदारी; संपर्कप्रमुख कदम यांची माहिती
2019 लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराला या मतदारसंघातून एक लाखाहून अधिक मते मिळाली होती. याचा फटका तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना बसला होता. त्यामुळेच वंचितची मते यावेळीही निर्णायक ठरणार आहेत. जिल्ह्यात आघाडी आणि युतीची अद्यापही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रात आपली उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे आगामी निवडणुकीत वंचित या मतदारसंघात विरोधी उमेदवारांना जोरदार टक्कर देणार हे निश्चित झाले आहे.