चंद्रपूर- आदिवासी मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत. दरम्यान, आज याविरोधात चिमूर येथे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जोडेमारो आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांच्या संस्थेतील आदिवासी वसतिगृहात चिमुकल्या विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले. या प्रकरणात स्पष्टीकरण देण्यासाठी काँग्रेसच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये मुलींचे पालक आर्थिक मदतीच्या आमिषाने तक्रारी करीत आहेत, असे वादग्रस्त आणि लज्जास्पद वक्तव्य करण्यात आले होते. यावेळी सुभाष धोटे यांच्यासोबत विधानसभेचे उपगटनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे लोकसभा उमेदवार बाळू धानोरकर उपस्थित होते.