चंद्रपूर- गावातील चार युवकासह जंगलात लाकडे आणण्यासाठी गेलेल्या एका युवकाला मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या जिवती तालूक्यातील नारपठार (विजयगुडा) येथे घडली.सोमराज इशरु सिडाम असे मृताचे नाव आहे.
जंगलात गेलेल्या युवकाचा मारहाणीमुळे मृत्यू; जिवती तालूक्यातील घटना - narpathar
सोमराज सिडाम मित्रांसह जंगलात लाकडे आणण्यासाठी गेला होता. यावेळी समोरून आलेल्या काहीजणांनी सोमराजवर हल्ला केला. यात तो जखमी झाला. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता त्याचा मृत्यू झाला.
सोमराज सिडाम,शंकर आत्राम,लिंबाराव कुमरे आणि राजू कूमरे हे चार युवक गावापासून अंदाजे पाच किमी अंतरावर असलेल्या जंगलात लाकडे आणण्यासाठी बैलगाडी घेऊन गेले होते. गेले. जंगलात गेल्यावर चढावावर बैलगाडी सोडून लाकडे जमा करण्यासाठी निघाले.यावेळी अचानक समोरुन आलेल्या काहीजणांनी सोमराजवर हल्ला केला. त्यामुळे त्याच्या सहकारी जंगलातून गावच्या दिशेने पळाले आणि घडलेली घटना गावकऱ्यांना सांगितली.
गावातील काही नागरिकांनी जंगलाकडे धाव घेतली आणि शोधाशोध केली. गावकऱ्यांना सोमराज गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. शुक्रवारी चार वाजता सोमराजचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. जिवती पोलीस ठाण्याचे ठाणेदार विश्वास पुल्लरवार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.