महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 1, 2022, 7:58 PM IST

ETV Bharat / state

Two Tigers Die in Tadoba : ताडोबामध्ये वेगवेगळ्या घटनेत दोन वाघांचा मृत्यू; 1 मादी वाघीण, तर 6 महिन्यांचा बछडा

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये दोन वेगवेगळ्या ( 1 Female Tigress and 6 months Old Calf ) घटनेत दोन वाघांचा मृत्यू झाल्याचे ( Two Tigers have Died in World Famous Tadoba ) समोर आले ( World Famous Tadoba Andhari Tiger Reserve ) आहे. पंधरा वर्षांची वाघीण (T75 ) आणि सहा महिन्यांचा बछडा मृत अवस्थेत आढळून आला. वाघिणीचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. इतर वाघाच्या हल्ल्यात बछड्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वनविभागाने वर्तवली

Two Tigers Die in Tadoba
ताडोबामध्ये वेगवेगळ्या घटनेत दोन वाघांचा मृत्यू

चंद्रपूर : जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये दोन वेगवेगळ्या घटनेत ( 1 Female Tigress and 6 months Old Calf ) दोन वाघांचा मृत्यू झाल्याचे ( Two Tigers have Died in World Famous Tadoba ) समोर आले ( Two Tigers Die in Separate Incidents in Tadoba ) आहे. पंधरा वर्षांची वाघीण (T75 ) आणि सहा महिन्यांचा बछडा मृत अवस्थेत ( World Famous Tadoba Andhari Tiger Reserve ) आढळून आला. कुजलेल्या स्थितीत असलेल्या वाघिणीचे अवयव साबूत होते. वाघिणीचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. इतर वाघाच्या हल्ल्यात बछड्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे.

वाघिणीचा मृत्यू 20-25 दिवसांअगोदर झाल्याचा अंदाज :ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनअंतर्गत येणाऱ्या शिवनी वनपरिक्षेत्रांतर्गत T75 वाघिणीचा मृतदेह आढळून आला. या वाघिणीचा मृत्यू 20-25 दिवसांअगोदर झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतावस्थेतील वाघीण खूप दिवसांपासून पडून होती. वनरक्षक आणि कर्मचाऱ्यांना ती दिसली. त्यांनी वरिष्ठांना तसे कळवले. त्यानुसार वरिष्ठांनी भेट दिली आणि पंचनामा केला.

मृत बछडा सहा ते सात महिन्यांचा :दुसऱ्या घटनेत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहूरली वनपरिक्षेत्रात कक्ष क्रमांक १८९ मध्ये वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळून आला. मृत बछडा सहा ते सात महिन्यांचा असल्याचा अंदाज वन विभागाने वर्तवला. शावकाच्या शरीरावर जखमा होत्या. नर वाघाच्या हल्ल्यात बछडाच्या मृत्यू झाल्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे. हा शावक T ६० मादीचा होता. दरम्यान, पुढील तपास वनविभाग करीत आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details