चंद्रपूर- दोन मित्र आज मॉर्निंग वॉकला गेले असता काळाने त्यांच्यावर झडप घातली. अज्ञात वाहनाने या दोघांनाही चिरडले. ज्यात दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील खरकाडा गावाजवळ घडली. मृतकांची नावे प्रशांत मुरलीधर सहारे आणि रोहित अशोक चट्टे अशी आहेत. हे दोघेही 18 वर्षांचे होते.
रोजच्याप्रमाणे प्रशांत व रोहित हे खरकाडा वरून आपल्या मित्रांसोबत मॉर्निंग वॉक करिता खरकाडा ते आरमोरी मार्गावर जात होते. 9 ऑक्टोंबर च्या पहाटे विद्यानगर रुई जवळील राईस मिल जवळ रस्त्याच्या कडेला प्रशांत व रोहित हे व्यायाम करीत होते. काही मित्र पुढे गेले होते. यावेळी व्यायाम करीत असताना अज्ञात वाहनाने दोघांनाही चिरडले. यात दोघांचाही जाग्यावर मृत्यू झाला.
ब्रम्हपुरीत मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन मित्रांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू - Road accident
दोन मित्र आज मॉर्निंग वॉकला गेले असता काळाने त्यांच्यावर झडप घातली. अज्ञात वाहनाने या दोघांनाही चिरडले ज्यात दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील खरकाडा गावाजवळ घडली.
घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरीचे ठाणेदार खाडे, एपीआय बन्सोड व बीट जमादार गेडाम घटनास्थळी दाखल झाले. व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. अज्ञात वाहनाचा शोध लावून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी मृतकांचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी केली आहे. याबाबत नागरिकांमध्ये रोष आहे. रस्त्याच्या कडेला व्यायाम करीत असताना अपघात झाला. त्यामुळे आरोपी हे बेजबाबदारपणे वाहन चालवत होते, असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. याची नेमकी स्थिती तपासात स्पष्ट होणार आहे.