महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Tadoba Gambling News : ताडोबात जुगार खेळताना वन अधिकाऱ्याच्या चालकासह दोन कर्मचाऱ्यांना अटक; दुर्गापूर पोलिसांची कारवाई - Tadoba Tiger Project

ताडोबात जुगार खेळताना उपविभागीय वन अधिकाऱ्यांच्या दोन कर्मचाऱ्यांसह त्यांच्या चालकाला अटक करण्यात आली आली आहे. दुर्गापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. चालकाचे नाव राकेश चौधरी तर आशिष डहाके, संतोष चौधरी अशी अन्य कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

Tadoba Tiger Project
Tadoba Tiger Project

By

Published : Apr 6, 2023, 4:12 PM IST

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील उपविभागीय वनाधिकारी यांचा चालकासह वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना जुगार खेळताना रंगेहाथ अटक करण्यात आली. चालकाचे नाव राकेश चौधरी तर आशिष डहाके, संतोष चौधरी अशी अन्य कर्मचाऱ्यांची नावे आहेत. यासोबतच आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई 4 एप्रिलला दुर्गापूर पोलीस ठाण्याअंतर्गत तुकुम परिसरात करण्यात आली. मात्र वनविभागाची बदनामी होऊ नये याबाबत पोलीस विभाग कमालीची गुप्तता पाळत आहेत.

पाच जणांना जुगार खेळताना रंगेहाथ अटक :राकेश चौधरी हा ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प (बफर) उपविभागीय वनाधिकारी कुशाग्र पाठक यांचा चालक आहे. त्याला जुगार खेळण्याचा शौक आहे. त्यामुळे इतर वन कर्मचाऱ्यांना घेऊन तो नेहमी जुगार खेळत असतो. 4 एप्रिलला नेहमी प्रमाणे तो तुकुम येथील मोगरे नावाचा व्यक्तीच्या घरी जुगार सुरू होता. याबाबतची गुप्त माहिती दुर्गापूर पोलिसांना मिळाली. यावेळी डीबी पथकाचे पोलीस कर्मचारी सुनील गौरकार त्यांच्या चमूने थेट या ठिकाणी धाड टाकली. यावेळी पाच जणांना जुगार खेळताना रंगेहाथ अटक करण्यात आली. यात तीन जण हे वनविभागात कार्यरत आहेत. यामध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प (बफर) उपविभागीय वनाधिकारी पाठक यांचा चालक राकेश चौधरी, लिपिक आशिष डहाके, संतोष चौधरी यांचा समावेश आहे.

राकेश चौधरीची 'अधिकारशाही :राकेश वनविभागात आपण डीएफओचा चालक आहे. म्हणून इतर कर्मचारी, अधिकाऱ्यांनाही धाकात ठेवण्याचे काम करतो, अशी चर्चा वनविभागात आहे. चालक असल्याने वनविभागात सुरू असलेले काळेपिवळे व्यवहार त्याला चांगले माहिती आहे. याचा उपयोग तो स्वतःच्या फायद्यासाठी करतो. एकदा तो चंद्रपूर बफर क्षेत्रात आपल्या मित्राला दुचाकीने घेऊन गेला होता. अतिसंवेदनशील असलेल्या या जंगलात तो, त्याच्या मित्राला पाहून एका गार्डने हटकले. या दरम्यान तिथे बेकायदेशीर रित्या बांबूपासून ताटवे तयार करण्याचे काम सुरू होते. त्याचे फोटो चालक चौधरी याने घेतले होते. याबाबत गार्डने त्याची तक्रार चंद्रपूर बफर क्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसकर यांच्याकडे केली. त्यांनी याबाबतची तक्रार उपविभागीय वनाधिकारी पाठक यांच्याकडे केली होती. यानंतर पाठक यांनी चालक चौधरी याची चांगलीच उघडणी केली होती. मात्र चौधरी यांने तिथे सुरू असलेली अवैध बांबू कटाई, त्याचे बनणारे ताटवे याचे फोटो दाखवल्याने डाव वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यावर उलटला. चौधरी याची अतिरेकी सक्रियता ही अनेकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. अधिकारांचा गैरवापर करून तो असा करतो अशी चर्चा वनविभागात आहे. आता जुगार प्रकरणी चौधरीवर तसेच इतर दोन कर्मचाऱ्यांवर जुगार खेळतानाचा गुन्हा दाखल झाला असल्याने आता वनविभाग त्यांच्यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

हेही वाचा - Hanuman Jayanti 2023: 105 फूट उंच हनुमान मूर्तीला चढवला रिमोटद्वारे दीड क्विंटल फुलांचा हार..

ABOUT THE AUTHOR

...view details