चंद्रपूर - महाऔष्णिक वीज केंद्र वसाहतीत पुन्हा एकदा वाघाचा वावर बघायला मिळाला आहे. चंद्रपूर वीज केंद्रातील राख साठवण केंद्राला जोडणाऱ्या भागात मुबलक छोटे वन्यजीव आणि पाणीसाठा यामुळे बिबटे आणि वाघांचा नेहमीच वावर असतो. वीज केंद्र परिसरात वाघाच्या एका कुटुंबाचे वास्तव्य असल्याने गेल्या २ वर्षांपासून या भागात अधिक काळजी घेत आहे.
वाघाचा दुचाकीस्वारावर हल्ल्याचा प्रयत्न; दुचाकीधारकांमध्ये दहशत - बिबटे
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र वसाहतीत पुन्हा एकदा वाघाचा वावर बघायला मिळाला आहे. चंद्रपूर वीज केंद्रातील राख साठवण केंद्राला जोडणाऱ्या भागात मुबलक छोटे वन्यजीव आणि पाणीसाठा यामुळे बिबटे आणि वाघांचा नेहमीच वावर असतो.
पर्यावरण चौक भागातील मार्गावर रस्ता ओलांडत असलेल्या वाघाचे नागरिकांना अनेकदा दर्शन झाले आहे. मात्र ऐन दुपारी थेट दुचाकीस्वारावर वाघोबा चाल करुन जात असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. वाघोबांनी जरा आक्रमक होत रस्त्याकडे चाल केली आणि या भागात असलेल्या दुचाकीस्वारांची उडालेली घाबरगुंडी या व्हिडिओत कैद झाली. ऐन वर्दळीच्या रस्त्यावर अचानक आलेल्या या वाघोबांनी काही क्षणांसाठी काळजाचा ठोकाच चुकविला. या भागात सतत वाघोबांचे दर्शनं होत असल्याने वनविभागाच्या निर्देशांनंतरही वीज केंद्र परिसरातील झुडुपांची तोडणी मात्र झालेली नाही. घाबरगुंडीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला तर वाघोबाच्या आक्रमकतेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.