महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, नागभीड तालुक्यातील घटना - Chandrapur Forest Department News

चंद्रपूर नागभीड तालुक्यातील मिंडाळा उपवन क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गावा लगतच्या स्मशानभुमी जवळील शेतात वाघाने केलेल्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परीसरात दहशत निर्माण झाली आहे.

tiger-killed-fema-in-chandrapur
वाघाच्या हल्यात महिला ठार

By

Published : Dec 24, 2019, 10:41 PM IST

चंद्रपूर -नागभिड तालुक्यातील मिंडाळा उपवन क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गावा लगतच्या स्मशानभुमी जवळील शेतात वाघाने केलेल्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना ५.०० च्या सुमारास घडली. मृत महिलेचे नाव सुलोचना हरी चौधरी (वय ५५ वर्ष) असे आहे. सततच्या वंन्य प्राण्याच्या हल्याच्या घटनांनी शेतकरी व शेतमजुरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

जिल्ह्यामध्ये कापूस वेचणी आणी इतर शेतीचे काम सुरू आहेत. मात्र, वाघ, बिबट आणि अस्वलाचा वाढता वावर आणि हल्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामूळे शेती मूख्य उत्पन्नाचे साधन असल्याने जिवावर उदार होऊन शेतीची कामे शेतकरी शेतमजूरांना करावी लागत आहे. नागभीड तालुक्या अंतर्गत येणाऱ्या मिडांळा येथे सांयकाळच्या सुमारास सुलोचना चौधरी या महिला वाघाच्या हल्यात ठार झाल्याने. शेती कामे कशी करायची हा प्रश्न पडला आहे. या घटनेची माहिती कळताच मिंडाळा उपवनक्षेत्राचे वनाधिकाऱ्यांनी घटना स्थळाकडे धाव घेतली. गावालगतच्या शेतात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीक करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details