चंद्रपूर - ब्रह्मपुरी विभागाच्या दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र कार्यालय अंतगत भुज राउंड मुरझा बिट मध्ये पट्टेदार वाघाची शिकार झाल्याचे उघडकीस आले आहे. या वाघाचे पंजे व डोके गायब आहे. या प्रकरणी वनविभागाने दोघांना ताब्यात घेतले आहे. वनविभागाचे वरीष्ठ अधिकारी आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. हा संपूर्ण परिसर वनविभागाने प्रतिबंधित केला असून पुढील तपास सुरू आहे.
ब्रह्मपुरीत वाघाची शिकार, डोके आणि पंजे गायब - Chandrapur Police News
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात पट्टेदार वाघाची शिकार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
ब्रह्मपुरीत वाघाची शिकार
ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र येथे वाघांची संख्या मोठी आहे. मात्र, वाघाची शिकार केल्याची अशी पहिलीच घटना समोर आली आहे. याबाबत तपास सुरू आहे.