चंद्रपूर - तीव्र उन्हाचे वन्यजीवांनाही कसे चटके बसतात आणि त्यापासून बचाव करण्यासाठी ते काय-काय कारनामे करतात, याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ताडोबातील एक वाघीण आणि तिचे चार पिल्ले पाण्यात मनसोक्त खेळ करत असल्याचे यात दिसत आहे.
उन्हाच्या तडाख्यात वाघोबाच्या कुटुंबाची जलक्रीडा; वाघिणीसह चार बछड्यांचा समावेश - Amit Whelekar
ताडोबातील एक वाघीण आणि तिचे चार पिल्ले पाण्यात मनसोक्त खेळ करत असल्याचे व्हिडिओत यात दिसत आहे.
छायाचित्र
सध्या चंद्रपूरचे तापमान ४६ अंशावर गेले आहे. त्यामुळे थंडाव्याची सर्वाधिक गरज वाघांना असते. वाघ तासंतास पाण्यात डुंबून शरीराची काहिली शांत करतो. यामध्ये तर अख्खे कुटुंबच पाण्याच्या आसऱ्याला आले आहे. पिलांनी मनसोक्तपणे पाण्यात उड्या घेत भावंडांसोबत मजा लुटली. सध्या हा व्हिडिओ चांगलाचे व्हायरल झाला आहे.