महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपूर : ताडोबामध्ये वाघाची शिकार, कोअर झोनमधील घटना - died

शिकारीसाठी लावण्यात आलेल्या तारेच्या सापळ्यात वाघ अडकला. त्यात त्याचा मृत्यू झाला. वन विभागाच्या सुरक्षा यंत्रणेचा हलगर्जीपणा समोर आला आहे.

चंद्रपुर : ताडोब्यात वाघाची शिकार

By

Published : Apr 13, 2019, 1:58 PM IST

Updated : Apr 13, 2019, 3:48 PM IST

चंद्रपूर - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाची शिकार झाल्याची धक्कादायक घटना आज समोर आली. कोअर झोनमधील खातोडा गेटपासून काही अंतरावर असलेल्या एका आंब्याच्या झाडाखाली वाघाचा मृतदेह आढळून आला. २ दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

शिकारीसाठी लावण्यात आलेल्या तारेच्या सापळ्यात वाघ अडकला. त्यात त्याचा मृत्यू झाला. कोअर झोन हे वाघांसाठी सर्वात सुरक्षित मानले जाते. येथे जंगल आणि वन्यजीवांची सर्वाधिक घनता आहे. अशा ठिकाणी शिकारीसाठी सापळा लावला होता. यामुळे वन विभागाच्या सुरक्षा यंत्रणेचा हलगर्जीपणा समोर आला आहे.

Last Updated : Apr 13, 2019, 3:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details