चंद्रपूरThree Youth Drowned In River: बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे यांचे मोठे वडील घनश्याम झित्राजि पोडे यांचे ११ नोव्हेंबर रोजी निधन झाले होते. त्यांचे अस्थिविसर्जन करण्यासाठी कुटुंब आज दुपारी २ वाजता वर्धा-इराई संगमावर गेले होते. गोविंदा पोडे यांचा मुलगा व भाचा नदीच्या प्रवाहात बुडत होते. त्यांना वाचविण्यासाठी उपसभाती गोविंदा पांडुरंग पोडे यांनी नदी पात्रात उडी घेतली. दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिघानाही वर्धा नदीपात्रात जलसमाधी मिळाली आहे.
एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू : बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील राहणारे आणि चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पांडुरंग पोडे ( वय ४७), त्यांचा एकुलता एक मुलगा चेतन गोविंदा पोडे ( वय १६) आणि त्यांचा भाचा गणेश रवींद्र उपरे (वय १७) असे वर्धा नदी पात्रात (Wardha River) जलसमाधी मिळालेल्यांची नावे आहेत. गोविदा पोडे हे बल्लारपूर पंचायत समितीचे देखील माजी सभापती होते. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे पंचक्रोशित शोककळा पसरली आहे. वर्धा नदी पात्रात कुटुंबातील सदस्यासमोर तिघे वाहून गेल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान शोध मोहिमेत सायंकाळी ५.४५ वाजता गोविंदा पोडे यांचा मुलगा चेतन पोडे याचा मृत्यदेह नावाड्यानी बाहेर काढला. अन्य दोघांच्या मृत्यदेह मिळाला आहे.
दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू: याआधीही अशीच एक घटना घडली होती. वेरूळ गावातील दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. खेळत असताना त्यावेळी अचानक पाय घसरल्याने आयुष नागलोत तलावात पडला. त्याला वाचवण्यासाठी संकेत बामणावत याने पाण्यात उडी घेतली होती. यात दोन मुलांचा मृत्यू झाला होता. ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून मुलांचे मृतदेह बाहेर काढले होते.