महाराष्ट्र

maharashtra

चंद्रपूर जिल्ह्यात मालगाडीच्या धडकेमुळे १३ रानटी डुकारांचा मृत्यू

By

Published : Jun 19, 2020, 3:33 PM IST

चंद्रपूर शहरातील दुसरे रेल्वेस्थानक असलेल्या चांदाफोर्ट येथून एक महत्त्वाचा रेल्वे मार्ग गोंदिया-जबलपूरकडे जातो. या रेल्वेमार्गावर आज सकाळी बल्लारपूर मार्गे गोंदियाकडे जाणाऱ्या रेल्वे मालगाडीच्या पुढ्यात अचानक रानडुकर आल्याने त्यांना जीव गमवावा लागला.

thirteen boar died after being crushed under the train in chandrapur
चंद्रपूर जिल्ह्यात मालगाडीच्या धडकेमुळे १३ रानटी डुकारांचा मृत्यू

चंद्रपूर- घनदाट जंगलामधून जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील चांदाफोर्ट- गोंदिया रेल्वेमार्गावर मालगाडीच्या धडकेने 13 रानडुकरांचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली. मुल शहराजवळ या मालगाडीने रानडुकरांना धडक दिली.

चंद्रपूर शहरातील दुसरे रेल्वेस्थानक असलेल्या चांदाफोर्ट येथून एक महत्त्वाचा रेल्वे मार्ग गोंदिया-जबलपूरकडे जातो. याच रेल्वेमार्गावर मूल शहराजवळ असलेल्या घनदाट जंगलाच्या परिसरात ही घटना घडली. सध्या प्रवासी रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे या मार्गावरून गाड्यांची वारंवारिता कमी आहे. केवळ मालवाहतूक करणाऱ्या गाड्या या भागातून जात आहेत. आज सकाळी बल्लारपूर मार्गे गोंदियाकडे जाणाऱ्या रेल्वे मालगाडीच्या पुढ्यात अचानक रानडुकर आल्याने त्यांना जीव गमवावा लागला.

वनविभागाच्या चमूने घटनास्थळी पोहचून रानडुकरांना पुरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यापूर्वी देखील या मार्गावर अनेक वन्यजीवांचा मृत्यू झाला आहे. दीड वर्षांपूर्वी एक वाघीण आणि तिचे तीन बछडे याच रेल्वे मार्गावर येऊन मृत पावले होते. त्यामुळे हा रेल्वे मार्ग वन्यजीवांच्या दृष्टीने घातक ठरत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मालगाडीच्या धडकेमुळे १३ रानटी डुकारांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details