चंद्रपूर :आज जागतिक व्याघ्रसंवर्धन दिन ( International Tiger Day ) हा पहिल्यांदाच चंद्रपूर शहरात राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात आला. केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव ( Environment Minister Bhupendra Baghel ) चंद्रपुरात असताना त्यांनी एका स्टॉलला भेट दिली. येथे उपस्थित महिला वन कर्मचाऱ्याने नकळत मराठीत संवाद साधत त्यांना या स्टॉलची माहिती दिली. असे असताना मूळचे हिंदी भाषिक असलेले यादव शांतपणे हे सर्व ऐकत होते, यावेळी त्यांना मराठी भाषेबद्दल विचारले असता त्यांनी 'मुझे मराठी समझती है' असे म्हणाले. यावेळी या कर्मचाऱ्याला ही चूक लक्षात येताच तिने हिंदीत संवाद साधायचा सुरू केले. मात्र, यादव यांनी 'आपण मराठीतच बोला', असा आग्रह केला. त्यामुळे सर्वांनाच सुखद धक्का बसला. यादव यांचा संयमीपणा, त्यांचे भाषाज्ञान हा चर्चेचा विषय ठरला आहे.
बांबू संशोधन, प्रशिक्षण केंद्राच्या स्टॉलला भेट -आज जागतिक व्याघ्रसंवर्धनदिन हा पहील्यांदाच चंद्रपूर शहरात राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात आला. देशाचे केंद्रीय पर्यावरणमंत्री भुपेंद्र बघेल ( Union Environment Minister Bhupendra Yadav) यांच्या मुख्य उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे ( Ashwini Kumar Choubey ) तसेच देशातील राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे ( National Tiger Conservation Authority ) वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील निवडक अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम आटोपल्यावर केंद्रीय पर्यावरण मंत्री यादव यांनी बांबू संशोधन, प्रशिक्षण केंद्राच्या स्टॉलला भेट दिली. येथे या केंद्राच्या पर्यवेक्षिका योगिता साठवणे उपस्थित होत्या. या केंद्रात बांबूपासून तयार होणाऱ्या वैविध्यपूर्ण वस्तूची माहिती देण्यास साठवणे यांनी सुरुवात केली, मात्र मराठीत.