चिमूर (चंद्रपूर) -चिमूर तालुक्यातील अमरपुरी-भान्सुली येथील शेत शिवारात आज सकाळी श्वानांनी हरणाच्या पाडसावर हल्ला केला. यापासून गावातील युवकांनी पाडसाला श्वानांच्या तावडीतून वाचविले आहे.
अमरपुरीतील तरुणांकडून हरणाच्या पाडसाची श्वानांच्या तावडीतून सुटका श्वानांनी केले जखमी
अमरपूरी गावालगत असलेल्या जंगलातून हरणाच्या कळपावर गावातील श्वानांनी हल्ला केला. यावेळेस श्वानांच्या तावडीत हरणाचे पाडस लागले. या पाडसाला श्वानांनी गावाजवळील शेतशिवारापर्यंत हल्ला करीत आणले. हे दृष्य गावातील युवकांनी पाहिले व श्वानांच्या तावडीतून हरणाच्या पाडसाची सुटका केली. श्वानांनी चावा घेतल्याने पाडस किरकोळ जखमी झाले.
'या तरुणांनी वाचवला पडसाचा जीव'
घटनेची माहीती पर्यावरण प्रेमींनी अमरपुरी-भान्सुली येथील वनरक्षक एस. पाटील यांना दिली. माहिती मिळताच घटना स्थळावर पोहोचून हरणाच्या पाडसाची तपासणी करून उपचार केले. पर्यावरण प्रेमी विशाल ढोक यांच्या मदतीने हरीणीला सुरक्षित जंगलात सोडण्यात आले. पाडसाचे जीव वाचविण्याचे उल्लेखनीय कार्य गावातील युवक समीर श्रीरामे, चेतन जांभुळे, पवन मटाले, अतुल खोब्रागडे, क्रिश घोंगडे, राजेंद्र चौधरी, नंदकुमार जांभुळे व दिलीप मेश्राम यांनी केले.
हेही वाचा -Mystery Girl.. गर्लफ्रेंडला घरातच लपवलं चक्क 10 वर्ष, आईवडीलांनाही लागला नाही थांगपत्ता