चंद्रपूर - अन्न व औषध विभाग तसेच शहर पोलिसांनी केलेल्या संयुक्तिक कारवाईत रेमडेसिवीर इंजेक्शन अवैधरित्या घेऊन जात असलेल्या दोन जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणात शहर पोलिसांनी एक डॉक्टर आणि दोन नर्सेसला अटक केली आहे. जावेद सिद्दीकी असे या डॉक्टरचे नाव आहे. हा डॉक्टर आणि दोन नर्सेस क्राइस्ट हॉस्पिटलमध्ये कामाला होते. या कारवाईमुळे चंद्रपुरात रेमडेसिवीरच्या सक्रिय रॅकेटचा उलगडा झाला आहे. हे रॅकेट खूप मोठे असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
चंद्रपुरात रेमडेसिवीरचा काळाबाजार; आणखी एक डॉक्टर आणि दोन नर्सेसला अटक - Remember injection fraud
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी देखील रुग्णांच्या नातेवाईकांकडून केल्या जात होत्या. त्यानंतर ही यंत्रणा जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात गेली. मात्र असे असताना देखील रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारे रॅकेट सक्रिय आहे. हे आता प्रशासनाने केलेल्या करवाईतून समोर आले आहे.
सध्या कोरोनाच्या महामारीत आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे चित्र आहे. रुग्णांना बेड देखील मिळत नाही, अशी स्थिती आहे. जे रुग्ण गंभीर आहेत अशांना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज असते. पूर्वी ही यंत्रणा या औषधाच्या वितरकांकडे होती. त्यात अनेकांना हे इंजेक्शन मिळत नव्हते. ही संपूर्ण प्रणाली संशयास्पद होती. त्यात काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी देखील रुग्णांच्या नातेवाईकांकडून केल्या जात होत्या. त्यानंतर ही यंत्रणा जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात गेली. मात्र असे असताना देखील रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारे रॅकेट सक्रिय आहे. हे आता प्रशासनाने केलेल्या कारवाईतून समोर आले आहे.
काल एका गुप्त ठिकाणी आरोपी इंजेक्शन घेऊन जात होते. प्रत्येकी 25 हजार या प्रमाणे हे इंजेक्शन विक्री करणार होते. अशी दोन इंजेक्शन त्यांचाकडून जप्त करण्यात आली. ही कारवाई गांधी चौक जवळील पुगलीया गल्ली येथील शुक्रवारी दुपारच्या सुमारास करण्यात आली. आशय उराडे आणि प्रदीप गणवीर अशी आरोपींची नावे आहेत. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. आरोपींना पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्यांनी क्राइस्ट हॉस्पिटलमध्ये काम करणारा डॉक्टर जावेद सिद्दीकी आणि दोन नर्सेस यांची नावे घेतली. या सर्वांना तपासासाठी बोलाविण्यात आले. यात पोलिसांना संशयास्पद आढळल्याने या तिघांनाही मध्यरात्री अटक करण्यात आली. हे तिघे रेमडेसिवीर बाहेर काढून द्यायचे आणि खुल्या बाजारात त्याची काळाबाजार करायचे. ही यंत्रणा कशी काम करीत होती, यापूर्वी त्यांनी असे किती रेमडेसिवीर विकले, त्यात या रुग्णालयातील वरिष्ठांचा हात आहे का, हा माल कुणाला विकला जात होता. याचा तपास शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.