महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ताडोबात २ वाघ शिरले पर्यटकांच्या ताफ्यात, दुचाकीस्वारांचा थोडक्यात वाचला जीव

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या रस्त्यावर आलेल्या वाघांचा रस्ता अडवून त्याचे व्हिडिओ शूट करणाऱ्या लोकांना हे करणे चांगलेच महागात पडले आहे.

tiger
वाघ

By

Published : Jun 2, 2021, 10:17 PM IST

Updated : Jun 3, 2021, 1:46 PM IST

चंद्रपूर - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या रस्त्यावर आलेल्या वाघांचा रस्ता अडवून त्याचे व्हिडिओ शूट करणाऱ्या लोकांना हे करणे चांगलेच महागात पडले आहे. ताडोबा व्यवस्थापणाने याची गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणी चार जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. यानंतर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.

माहिती देताना मोहर्लीचे वनपरिक्षेत्राधिकारी राघवेंद्र मून

हेही वाचा -कौतुकास्पद! रेल्वे रुळावर बेशुद्ध पडलेल्या महिलेचे पोलिसांनी पायपीट करत वाचविले प्राण

  • वाघांची वाट अडवल्याने नोटीस -

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प हा वाघांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या वाघांचे दर्शन घेताना अनेकदा काही अतिउत्साही लोकांकडून नियमांचा भंग केला जातो. दोन दिवसांपूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पच्या बफर क्षेत्रात येणाऱ्या पद्मापूर-मोहर्ली मार्गावर दोन वाघ मुक्तसंचार करताना दिसून आले. त्यांना बघण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही दिशेने वाहनांची गर्दी जमली. वाघांचा किंवा अन्य प्राण्यांच्या रस्ता रोखणे हा गुन्हा आहे. असं असताना काही दुचाकीस्वारांनी या दोन वाघांचा रस्ता अडवला. आपल्या जीवाची पर्वा न करता वाघ जवळ आला असताना देखील वाघांचा व्हिडिओ शूट करण्यात येत होता. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दोन वाघ रस्त्याच्या कडेला भ्रमण करत असताना नियमानुसार त्यांची वाट मोकळी करण्याऐवजी त्यांची वाट अडवून चित्रीकरण करण्यात आले.

  • चार जणांना नोटीस

शिवाय हौशीपणा दाखवणाऱया व्यक्तीने हा व्हिडिओ स्वतःच्या फेसबूक खात्यावर शेअर केला. या प्रकाराची गंभीर दखल घेत वनविभागाने 4 व्यक्तींना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. चित्रीकरण करणारा दुचाकीस्वार होम-स्टे मालक अरविंद बंडा याच्यासह 4 व्यक्तींना ही नोटीस देण्यात आली असून, समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा -भाजपा ओबीसींची दिशाभूल करत आहे - नाना पटोले

Last Updated : Jun 3, 2021, 1:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details