महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 19, 2020, 10:26 PM IST

ETV Bharat / state

चिमूरमध्ये विहिरीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या

रेंगाबोडी येथील अविवाहित युवकाने बसस्टॉप जवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली

युवकाची आत्महत्या
युवकाची आत्महत्या

चिमूर (चंद्रपूर) -चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रेंगाबोडी येथील अविवाहित युवकाने बसस्टॉप जवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजता दरम्यान घडली. अनिरुद्ध दिवाकर पेरकुंडे (वय २३) वर्ष राहणार रेंगाबोडी, असे मृतक युवकाचे नाव आहे.

अनिरुद्ध रक्त तपासणी लॅब मध्ये काम करत होता-

चिमूर हिंगणघाट रस्त्यावरील खडसंगी जवळील रेंगाबोडी येथील रहिवासी असलेले दिवाकर पेरकुंडे पत्नी व दोन मुलांसोबत रेंगाबोडी येथे राहत होते. शेतात मोल-मजुरी करून आपल्या परिवाराचे पालन पोषण करून त्यांनी दोन मुलांचे शिक्षण पूर्ण केले. अनिरुद्ध पेरकुंडे हा चिमूर येथील एका रक्त तपासणी लॅब मध्ये काम करून परिवाराला हातभार लावत होता.

दोन वाजता बसस्टॉप जवळील विहिरीत घेतली उडी-

आई वडील सकाळीच कापूस वेचणीसाठी शेतावर गेले. त्यामुळे अनिरुद्ध घरी एकटाच होता. शनिवारी दुपारी दोन वाजता त्याने बसस्टॉप जवळील विहिरीत उडी घेतली. बसस्टॉपवर असलेल्या युकांनी विहिरीत उडी घेऊन वाचवण्याचा प्रयत्न केला. गावकाऱ्यांच्या मदतीने अनिरुद्धला विहिरीतून बाहेर काढले. मात्र उपचारासाठी खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत असताना वाटेतच अनिरुद्धचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचवून पंचनामा केला. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले. पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.

हेही वाचा-तळसंगी तलावात बुडून आईसह दोन मुलींचा मृत्यू; मंगळवेढ्यातील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details