महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 7, 2020, 4:36 PM IST

ETV Bharat / state

चंद्रपुरात राज्य राखीव दलाचे तीन जवान 'पॉझिटिव्ह',जिल्ह्यात एकूण 125 कोरोनाबाधित

सोमवारी रात्री उशिरापर्यंत एकूण ७ पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असून यामध्ये तीन राज्य राखीव दलाच्या जवानांचा समावेश आहे. ते पुण्यातील निवासी आहेत.संबंधितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांना अद्याप कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. यानंतर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १२५ झाली आहे.

चंद्रपूर - सोमवारी रात्री उशिरापर्यंत एकूण ७ पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असून यामध्ये तीन राज्य राखीव दलाच्या जवानांचा समावेश आहे. ते पुण्यातील निवासी आहेत.संबंधितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांना अद्याप कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. यानंतर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १२५ झाली आहे.

आतापर्यंत ६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून अद्याप ६३ अॅक्टिव्ह केसेस आहेत. मंगळवारी दुपारी जिल्हा आरोग्य यंत्रणेनेकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्याचे रहिवासी असलेल्या आणि संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या २३, ५३ व २३ वर्षे वयाच्या तीन जवानांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्व पुण्यातून आले होते. एक जुलैला एकाच ठिकाणी हे तीनही जवान संस्थात्मक अलगीकरणात होते.

सोमवारी दिवसभरात एकूण चार पॉझिटिव्ह सापडले. यामध्ये नागपूरच्या कामठी परिसरातून २६ जून रोजी परत आलेल्या २७ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. या व्यतिरिक्त पडोली येथील एमआयडीसीत काम करणाऱ्या ३६ वर्षाच्या व्यक्तीची अहवाल पॉझिटिव्ह आलाय. या व्यक्तीने दोन ठिकाणी खासगी इस्पितळात ताप आल्यामुळे तपासणी केली होती.

महानगरपालिका क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या भिवापूर वार्ड परिसरातील ३० वर्षीय महिलेचा देखील समावेश आहे. हैदराबाद शहरातून ही महिला चंद्रपूरात आली होती. अन्य बाधित हा करंजी येथील पॉझिटिव्ह बाधितांच्या संपर्कातील आहे. पोंभूर्णा तालुक्यातील मौदा येथील 21 वर्षीय तरुण संस्थात्मक अलगीकरणात होता. काल स्वॅब घेण्यात आल्यानंतर त्याला बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details