महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ब्रम्हपुरीत एसटीच्या वाहतूक निरीक्षकाची आत्महत्या; विषप्राशन करून संपविले जीवन - कामबंद आंदोलन

ब्रम्हपुरी आगार येथील 33 वर्षीय वाहतूक निरीक्षक म्हणून कार्यरत सत्यजित ठाकूर याने आपल्या राहत्या घरी विषप्राशन करून आत्महत्या केली. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

वाहतूक निरीक्षकाची आत्महत्या
वाहतूक निरीक्षकाची आत्महत्या

By

Published : Nov 8, 2021, 10:37 PM IST

चंद्रपूर : संपूर्ण राज्यात एसटी कर्मचारी आंदोलन करीत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली. यापूर्वी एका कर्मचाऱ्याने एसटीलाच गळफास लावून आत्महत्या केली होती. ह्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच ब्रम्हपुरी येथील वाहतूक निरीक्षकाने विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली असल्याचे समोर आले. सत्यजित ठाकूर असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात कामबंद आंदोलन पुकारले आहे. इतर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत येथील कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे यासाठी हे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू असतानाच एका कर्मचाऱ्याने थेट एसटीला गळफास लावत आत्महत्या केल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. ही घटना ताजी असताना ब्रम्हपुरी आगार येथील 33 वर्षीय वाहतूक निरीक्षक म्हणून कार्यरत सत्यजित ठाकूर याने आपल्या राहत्या घरी विषप्राशन करून आत्महत्या केली. हा कर्मचारी मागील तीन दिवसांपासून ब्रम्हपुरी येथील आपल्या घरीच होता. तर पत्नी ही नागपुरात राहते. कालपासून सत्यजित ठाकूर यांचा फोन स्विच ऑफ येत होता. त्यामुळे पत्नीने त्यांच्या मित्राला फोन लावून याची माहिती दिली. तो घरी गेला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला.

ABOUT THE AUTHOR

...view details