चंद्रपूर -संपत्तीच्या लोभापायी मुलाने पित्याचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली. घटनेनंतर मुलाने ही घटना आकस्मिक असल्याचे दाखवून आपल्या वडिलांचा अंत्यसंस्कारही केला. मात्र, मुलीने हा खून असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि यात मुलाने हत्या केल्याचे समोर आले आहे.
धक्कादायक ! चंद्रपुरात पोटच्या मुलाकडून संपत्तीसाठी वडिलांचा खून, बहिणीकडून भावाच्या कृत्याची पोलखोल - son murdered his father
मुलगी वैशाली दादाजी खोबरागडे हिने २४ जुलैला सिंदेवाही पोलीस ठाण्यात जाऊन वडिलांचा मृत्यू आकस्मिक नसून हत्या करण्यात आल्याची तक्रार दिली. यानंतर पोलीस तपासात मुलगा राजेश यानेच वडिलांचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली.
सिंदेवाही तालुक्यातील मिनघरी गावात दादाजी राघोजी खोब्रागडे नावाचे प्रतिष्ठित शेतकरी सहकुटुंब राहत होते. त्यांना राजेश नावाचा मुलगा व वैशाली नावाची मुलगी आहे. तापट व रागीट स्वभावाचा राजेश कोणतेही काम करत नव्हता. तो वडिलांना नेहमीच पैशासाठी मारहाण करायचा. अशातच दादाजी यांना शेतीच्या सौद्यातून ६ लाख रुपये मिळाले. मुलाच्या मारहाणीच्या भीतीने दादाजींनी राजेशला ४ लाख रुपये दिले. त्यानंतर वडिलांनी मुलाला दिलेल्या रकमेचे काय केले ही विचारणा केली असता, त्याला याचा राग आला. वडील आपल्याला संपत्ती मिळविण्यास अडसर ठरत असल्याने त्याने वडिलांचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. २२ जुलैला २ साथीदारांना सोबत घेऊन रात्री साडेसात वाजता घराशेजारीच असलेल्या शेतात वडिलांचा गळा आवळून खून केला. राजेशने ही बाब आपली बहीण आणि जवळचे नातेवाईक यांच्यापासून लपवून ठेवली आणि त्यांचा मृत्यू आकस्मिक झाला असल्याचा बनाव करुन त्यांच्या मृतदेहाला चिताग्नी सुद्धा दिली.
मुलगी वैशाली दादाजी खोब्रागडे हिने २४ जुलैला सिंदेवाही पोलीस ठाण्यात जाऊन वडिलांचा मृत्यू आकस्मिक नसून हत्या करण्यात आल्याची तक्रार दिली. यानंतर पोलीस तपासात मुलगा राजेश यानेच वडिलांचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली. याप्रकरणी आरोपीवर भारतीय दंड विधान कलम ३०२ आणि २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.