चंद्रपूर : महाविकास आघाडीतर्फे पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला चंद्रपुरात गालबोट लागले. काही अतिउत्साही शिवसैनिकांनी चक्क शिवभोजन थाळी देणाऱ्या हॉटेलची तोडफोड केली. यात मालकाचे मोठे नुकसान झाले. शिवभोजन थाळी हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्वाचा उपक्रम असतानाही तोडफोड झाली.
Maharashtra band : चंद्रपूरमध्ये शिवसैनिकांकडून शिवभोजन देणाऱ्या हॉटेलची तोडफोड - shivbhojan thali
सोमवारी महाराष्ट्र बंदचे तंतोतंत पालन करत काही अतिउत्साही शिवसैनिकांनी चंद्रपूरमधील शिवभोजन देणाऱ्या हॉटेलची तोडफोड केली. याबाबत जिल्हाप्रमुखांनी दिलगिरी व्यक्त केली असून, त्याबाबत नुकसान भरपाई देणार असल्याचेही सांगितले.
Maharashtra band
मालकाला नुकसान भरपाई देणार
या प्रकरणात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. जे झालं ते चुकीचं झालं. त्यानुसार आम्ही मालकाची जाहीर माफी मागितली आहे, तसेच जेवढे काही नुकसान झाले त्याची पै न पै आम्ही भरून देणारे आहे. अशी स्पष्टोक्ती गिर्हे यांनी दिली.
हेही वाचा -भाजपाला सत्तेची मस्ती, अद्यापही केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही - सुप्रिया सुळे