महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रमजान : मुस्लिमांनी घरीच अदा करावी नमाज.. मौलाना तंजील रजा यांचे आवाहन

पवित्र महिना रमजान २५ एप्रिल आजपासून प्रारंभ होत आहे. रमजानला इस्लाममध्ये अनन्य साधारण महत्व असते. मात्र सध्या भारतावर कोरोनाचे संकट आले आहे. त्यामुळे इफ्तार, तराबिह व इतर नमाज घरीच अदा करावी, असे आवाहन रज़ा सुन्नी मस्जिद चिमुरचे मौलाना मो. तंजील रजा यांनी समस्त मुस्लिम बांधवांना केले आहे.

Ramzaan month Muslims should pray namaj at home
रमजान : मुस्लिमांनी घरीच अदा करावी नमाज

By

Published : Apr 25, 2020, 2:57 PM IST

चिमुर( चंद्रपूर ) - पवित्र महिना रमजान २५ एप्रिल आजपासून प्रारंभ होत आहे. या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव पूर्ण एक महिन्याचे निरंक उपवास (रोजा) ठेवतात. या महिन्यात ईशाच्या नमाजच्या वेळेस तरावीहची नमाजचे पठन केले जाते व या नमाजला विशेष महत्व असते. कारण संपूर्ण महिना चालणार्‍या या नमाजमध्ये एका महिन्यात पूर्ण कुराण ए शरिफचे पठण केले जाते. तसेच पवित्र महिना रमजानला इस्लाममध्ये अनन्य साधारण महत्व असल्याने समस्त मुस्लिम बांधव या रमजानमध्ये एक महिन्याचे उपवास ठेवून अल्लाहची इबादत करतात.


सध्या भारत देशावर कोरोनाचे संकट उद्भवले आहे. कोरोना हे संसर्गजन्य रोग असल्याने नागरिकांनी जास्त लोकांच्या संपर्कात येऊ नये ही काळाची गरज आहे. तसेच सर्वांच्या सुरक्षेसाठी शासन योग्य ते पाऊल उचलत असून या संकटाला परतवून लावण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये येणार्या पवित्र महिना रमजानमध्ये मुस्लिम बांधवांनी इफ्तार, तराबीह व इतर नमाजचे पठण करण्यासाठी घराबाहेर पडू नये. जसे आत्तापर्यंत सरकारला सहकार्य करीत घरी नमाज अदा करीत आहात तशीच रमजान मध्येही इफ्तार, तराबिह व इतर नमाज घरीच अदा करावी, असे आवाहन रज़ा सुन्नी मस्जिद चिमुरचे मौलाना मो.तंजील रजा यांनी समस्त मुस्लिम बांधवांना केले आहे. तसेच मुस्लिम बांधवांनी प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, बाजारात गर्दी करने टाळावे व कमी गरजे वरती रमजान साजरा करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. तसेच तरावीहची नमाज घरीच वैयक्तिकरित्या ही पठन केल्यास त्याचा तेवढाच सवाब मिळतो व कोरोनाचा लवकरात लवकर नायनाट व्हावा त्यापासून समस्त भारतीयांचे रक्षण व्हावे यासाठी या पवित्र रमजान महिन्यात सर्वांनी प्रार्थना (दुआ) करावी असे ते म्हणाले.

◆ शबे कद्रची नमाजही घरीच अदा करावी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे व भविष्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन पुढे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात लॉकडाऊन वाढल्यास पवित्र रमजान महिन्यात येणारी मोठी रात्र शबे कद्र ची नमाजही घरातच अदा करावी, असे आवाहन रज़ा सुन्नी मस्जिदचे मौलाना तंजील रज़ा यांनी मुस्लिम बांधवांना यावेळी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details