महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 27, 2019, 8:27 AM IST

Updated : Jul 27, 2019, 10:31 AM IST

ETV Bharat / state

धक्कादायक.! केवळ 3 डबेच घेऊन धावली संघमित्रा एक्सप्रेस; 22 डबे राहिले पाठीमागेच

धावत्या रेल्वेचे २२ डबे मागे सुटल्याचा प्रकार वरोरा तालुक्यातील माजरी रेल्वे स्थानकाजवळ घडला. दोन डब्यांना जोडणारा जॉईंट तुटल्याने हा प्रकार घडला आहे. केवळ ३ डबेच घेऊन संघमित्रा एक्सप्रेस पुढे गेली.

धावत्या रेल्वेचे २२ डबे सुटले मागे

चंद्रपूर - धावत्या रेल्वेचे २२ डबे मागे सोडून केवळ तीन डब्यांसह इंजिन पुढे गेल्याचा प्रकार वरोरा तालुक्यातील माजरी रेल्वे स्थानकाजवळ घडला. दोन डब्यांना जोडणारा जॉईंट तुटल्याने हा प्रकार घडला आहे. केवळ ३ डबेच घेऊन संघमित्रा एक्सप्रेस पुढे गेली.

केवळ 3 डबेच घेऊन धावली संघमित्रा एक्सप्रेस

पाटणा-बंगळुर रेल्वे क्रमांक 12296 ही संघमित्रा एक्सप्रेस संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी नागपूर येथून बल्लारपूरकडे निघाली होती. रात्री साडेआठच्या सुमारास या एक्सप्रेसचे 22 प्रवासी डब्बे सुटले. दोन डब्यांना जोडणारा जॉईंट तुटल्याने हा प्रकार घडला. त्यामुळे इंजिन मागील तीन डब्बे घेऊन पुढे गेले. हा प्रकार समजल्यानंतर प्रवासी भयभीत झाले होते.

Last Updated : Jul 27, 2019, 10:31 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details