चंद्रपूर - वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या खाली येऊन एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. वरोरा तालुक्यातील पाताळा गावाजवळ सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
चंद्रपुरात ट्रकखाली येऊन पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू - पोलीस
माजरी येथून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. वाहने भरधाव वेगाने चालवली जातात. त्यामुळे आज एका पोलीस कर्मचाऱ्याचा नाहक बळी गेला आहे.
सुनील खरोले असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. खरोले मजारी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते आज दुपारच्या सुमारास एका गुन्ह्याच्या तपासासाठी वरोरा येथे जात होते. त्यांच्यापुढे वाळूची वाहतूक करणारा ट्रक देखील जात होता. वरोरा येण्यापूर्वी या ट्रकने अचानक वळण घेतली. यामध्ये सुनील खरोले यांची दुचाकी ट्रकच्या मागच्या चाकात आली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
माजरी येथून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. वाहने भरधाव वेगाने चालवली जातात. याच ठिकाणाहून वाळूची अवैध तस्करी देखील केली जाते. मात्र, संबंधित ट्रकमध्ये नेली जाणारी वाळू अवैध होती का? हा तपासाचा विषय आहे. मात्र, या ट्रकमध्ये येऊन एका पोलीस कर्मचाऱ्याचा नाहक बळी गेला आहे.