कोरोना ईफेक्ट : चंद्रपुरात तापाची साथ, बैलगाडीने उपचारासाठी रुग्णालयात आणले रुग्ण
बहूतांश रुग्ण खासगी रुग्णालयात धाव घेत आहेत. शासकीय रुग्णालयातही रुग्ण गर्दी करत आहे. राज्यात संचारबंदी लागू असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. दुसरीकडे पेट्रोल, डिझेल वेळेवर उपलब्ध होत नसल्याने दुचाकी, चारचाकी वाहने उभी आहेत.
चंद्रपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल, डिझेलचा तूटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दूचाकी,चारचाकी वाहने बंद आहेत. अशा स्थितीत सकमुरातील आजारी महिलेला बैलगाडीवर टाकून सात किमीअंतरावरील धाबा येथे आणण्यात आले. संचारबंदीचा फटका ग्रामीण भागालाही बसत असल्याचे दृश्य या घटनेतून समोर आले आहे.
गोंडपिपरी तालूक्यातील सकमुर येथे तापाची साथ पसरली आहे. प्रत्येक घरात तापाचे रुग्ण फणफणत आहेत. बहूतांश रुग्ण खासगी रुग्णालयात धाव घेत आहेत. शासकीय रुग्णालयातही रुग्ण गर्दी करत आहे. राज्यात संचारबंदी लागू असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. दूसरीकडे पेट्रोल, डिझेल वेळेवर उपलब्ध होत नसल्याने दूचाकी, चारचाकी वाहने उभी आहेत. अशा बिकट स्थितीत सकमुर येथिल निर्मलाबाई कोरडे यांची प्रकृती अचानक बिघडली. उपचाराकरता त्यांना तातडीने रुग्णालयात हलविणे गरजेचे होते. मात्र, वेळेवर वाहन उपलब्ध न झाल्याने त्यांना बैलगाडीने धाबा येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. कोरोनाचा प्रभावाने महानगर, शहरांना फटका बसत होता. आता ग्रामीण भागातही कोरोना प्रभाव जानवित आहे.