महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रवासी वाहतूक करणारे वाहन पालटले;14 प्रवाशी जखमी - chandrapur accident news

अवैध्यरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाने दुचाकी वाहनाला धडक दिल्याने अपघात झाला आहे. हिंगणघाट वरुन चिमूरला जाताना खडसंगी कोरा मार्गवरील रेंगाबोडी गावाजवळ ही घटना घडली. या अपघातात 14 प्रवासी जखमी झाले असुन काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.

passenger vehicle and bike met an accident; 14 injured
प्रवासी वाहतूक करणारे वाहन पालटले;14 प्रवाशी जखमी

By

Published : Dec 14, 2019, 12:03 AM IST

चंद्रपूर - अवैध्यरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाने दुचाकी वाहनाला धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना घडली. हिंगणघाटवरुन चिमूरला जाताना खडसंगी कोरा मार्गवरील रेंगाबोडी गावाजवळ ही घटना घडली. या अपघातात 14 प्रवासी जखमी झाले असून काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.

हेही वाचा - कडकनाथ कोंबडी घोटाळा : शेतकऱ्यांचे आझाद मैदानात आंदोलन, आरोपींची संपत्ती विकून नुकसान भरपाईची मागणी

चिमूर येथे आठवडी बाजार असल्याने अनेक प्रवासी वाहनाने कोरा येथून चिमूरला जात होते. दरम्यान, रेंगाबोडी जामणी मार्गाने जात असताना खडसंगी वरून जाणाऱ्या दुचाकी वाहनास या प्रवासी वाहनाने धडक दिली. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात, वाहनाने एका पाठोपाठ एक 3 पलटी मारल्या. या दरम्यान, वाहनातील 14 प्रवाशी जखमी झाले. स्थानिकांना अपघाताबद्दल माहीती होताच त्यांनी घटनास्थळी येऊन जखमींना खडसंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानतंर प्राथमिक उपचारानंतर काही जखमींना उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यापैकी दुचाकी स्वारांना गंभीर दुखापत झाल्याने चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

तृप्ती शंकर ठवरे (35 वर्ष रा. मालेवाडा) युवराज धनराज आडे (40 रा. चीचघट) सुनील महादेव बोरकुटे (40 रा.येरखंडा) शालीकराम केशवराव मोहणापुरे (70 रा.पाथल) लता रमेश इंगोले (50 रा.चिकना) रमेश शंकर इंगोले (52 रा. चिकणा) जयेश दिपराम ठाकरे (रा. राळेगाव, जि. यवतमाळ),चेतन संजय इंगोले (रा. चिकणा) रामभाऊ महादेव भोयर (70 रा. बोदापुर) वेणूताई नारायण इंगोले (रा. चिकणा) वसंता शेरकी (रा. बाम्हणी) गणपत राजेराम शेंडे (रा. कासारवाडी) नोराबाई शालीकराम मानापुरे (रा. पंथाला) आकाश भगवान जांभळे (रा. चिमूर) या सर्व जखमींवर खडसंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. तर गंभीर जखमींना उपजिल्हा रुग्णालय चिमूर व चंद्रपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details