महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तेलंगणातील अपघातात चंद्रपूरच्या तरुणाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी - Road Accident in telngana

पत्नीला माहेरी सोडायला जात असताना दुचाकीला ट्रकने धडक दिली. या घटनेत पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली.  ही घटना रविवारी दुपारी तेलंगणातील मुथ्थमपेठ गावाजवळ घडली.

तेलंगणातील अपघातात चंद्रपूरच्या तरुणाचा मृत्यू

By

Published : Nov 25, 2019, 3:01 PM IST

चंद्रपूर- पत्नीला माहेरी सोडायला जात असताना दुचाकीला ट्रकने धडक दिली. या घटनेत पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी दुपारी तेलंगणातील मुथ्थमपेठ गावाजवळ घडली. मृत आकाश शहाजी झाडे चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथील रहिवाशी आहे.

आकाश झाडे यांची सासुरवाडी तेलंगणातील कवठाळा येथे आहे. तो काल आपल्या बाईकने पत्नीसह कवठाळ्याला निघाला. यावेळी ट्रकने त्याच्या बाईकला जोरदार धडक दिली. यात आकाशचा जागीच मृत्यू झाला. तर, त्याची पत्नी पल्लवी ही गंभीर जखमी झाली. पल्लवीवर मंचेरियाल येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. २६ वर्षीय आकाशचे असे अकस्मात निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details