महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंगणवाडी सेविकांच्या आरोग्याशी खेळ; आरोग्यसुरक्षा साहित्याशिवाय जुंपले कामाला - चिमूर चंद्रपूर कोरोना बातम्या

कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असतानाही घरोघरी फिरुन अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम सुरू आहे. आशा वर्करला सुरक्षेकरीता मास्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, अंगणवाडी सेविका तथा मदतनिसांना मास्क, हँन्ड वॉश किंवा सॅनिटायजर शिवाय काम करावे लागत आहे.

चिमूर
चिमूर

By

Published : Mar 28, 2020, 8:29 PM IST

चिमूर (चंद्रपूर) - आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या लक्षात घेता अंगणवाडी कर्मचारी व आशा वर्कर यांची कोरोना विरोधातील लढाईत राज्यभर मदत घेण्यात येत आहे. मात्र, घरोघरी फिरून बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांची माहिती, तसेच त्यांना सूचना देणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायजर अथवा हातमोजे इत्यादी साहित्य न देता कामाला जुंपले असल्याने त्यांच्या आरोग्याशी खेळ चालवला आहे.

देशात व राज्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या दिवसें-दिवस वाढतच चालली आहे. आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणि कोरोनाचा प्रसार रोखण्याकरिता युद्ध स्तरावर प्रयत्नाची आवश्यकता लक्षात घेऊन राज्य शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच आशा वर्कर यांची सेवा घेण्यात येत आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आशा वर्कर सोबत जाऊन अंगणवाडी क्षेत्रात बाहेर गावातून आलेल्यांची सविस्तर माहिती घेऊन त्यांना घरीच राहून इतरांच्या संपर्कात येऊ नये, अशी सूचना देणे, याची माहिती नगर परीषद तथा प्राथमिक आरोग्य केंद्राला द्यायची आहे.

कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असतानाही घरोघरी फिरुन अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम सुरू आहे. आशा वर्करला सुरक्षेकरता मास्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, अंगणवाडी सेविका तथा मदतनिसांना मास्क, हँन्ड वॉश किंवा सॅनिटायजर शिवाय काम करावे लागत आहे. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विमा सुरक्षा कवचही देण्यात आले नसल्याने सेविका व मदतनीस नाराजी व्यक्त करत आहेत. त्यांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी अंगणवाडी कर्मचारी करत आहेत.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कोरोना विषाणुचा संसर्ग होऊ नये, या करता प्रतिबंधात्मक साहित्य म्हणून मास्क, सॅनिटायजर किंवा हँन्ड वॉश अथवा हातमोजे दिलेले नाहीत. तसेच कोणतेही विमा कवच नसताना नागरिकांच्या सुरक्षेकरिता, कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही कर्तव्य करत आहोत, असे अंगणवाडी सेविका माधुरी वीर म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details