महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिव्यांग प्रमाणपत्राची नवी डिजिटल प्रणाली; साडेपाच हजार दिव्यांगांनी घेतला लाभ

2018 पासून दिव्यांग प्रमाणपत्रासाठी नवी डिजिटल प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या नवीन प्रणालीच्या माध्यमातून आता दिव्यांग लोकांना कायमस्वरूपी कार्ड देण्यात येत आहे.

new-digital-system-for-disability-certification-in-chandrapur
दिव्यांग प्रमाणपत्राची नवी डिजिटल प्रणाली; साडेपाच हजार दिव्यांगांनी घेतला लाभ

By

Published : Dec 31, 2020, 3:54 PM IST

चंद्रपूर -दिव्यांग लोकांना त्यांना विविध योजना, सवलती आणि आरक्षणासंदर्भात अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले जाते. 2013 ते 2018 पर्यंत ही प्रणाली राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू होती. मात्र, 2018 पासून याचे डिजिटायजेशन करण्यात आले. तेव्हापासून तर आतापर्यंत या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा 5,644 दिव्यांगांनी याचा लाभ घेतला आहे. या नवीन प्रणालीच्या माध्यमातून आता दिव्यांग लोकांना कायमस्वरूपी कार्ड देण्यात येत आहे. तसेच हीे सेवा घरपोच उपलब्ध करून देण्यात येत आहे.

बाळासाहेब चव्हाण यांची प्रतिक्रिया

राज्य शासनाची प्रणाली -

पूर्वी दिव्यांगांची तपासणी ही पुर्णतः मानवी पद्धतीने केली जात होती. या प्रक्रियेत वेळ जात होता. त्यामुळे दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विलंब होत होता. 2013 मध्ये राज्य शासनाने याकरिता नवे सॉफ्टवेअर आणले आणि खऱ्या अर्थाने या यंत्रणेचे डिजिटायजेशन झाले. 2013 ते 2018 या दरम्यान राज्य शासनाची ही प्रणाली सुरू होती. यादरम्यान एकूण 13 हजार 946 लोकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 2,759 हे नामंजूर झाले. तर 11 हजार 186 दिव्यांगांना प्रमाणपत्र प्राप्त झाले. यामध्ये दृष्टीने दिव्यांग असलेले 1425, ऐकण्यात दिव्यांग असलेले 1837, मानसिकरित्या दिव्यांग 73, गतिमंद 2433, शारीरिक दिव्यांग 5418 यांचा समावेश आहे. 2018 पासून केंद्र सरकारच्या अखत्यारीत ही यंत्रणा गेली. त्यानुसार त्यात बदल करण्यात आला. या दिव्यांग लोकांना केवळ प्रमाणपत्र नाही, तर आता एक आजीवन असे कार्ड दिले जात आहे. त्यात लाभार्थ्याची सर्व माहिती नमूद असणार आहे. हे कार्ड सोबत घेऊन जाण्यासही सुलभ आहे. त्यामुळे दिव्यांगांना हे कार्ड दाखवून आवश्यक त्या ठिकाणी लाभ घेता येत आहे.

केंद्र सरकारची प्रणाली -

2018 ते 2020 यादरम्यान एकूण 7425 नवे अर्ज प्राप्त झाले. यापैकी 4,736 कार्ड दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात आले. तर 344 अर्ज नामंजूर करण्यात आले. तर 2765 डिजिटल अर्ज प्राप्त झाले. यापैकी 908 जणांना कार्ड वितरित करण्यात आले, तर 95 अर्ज बाद झाले. तसेच कोरोनाच्या काळात देखील ही प्रक्रिया सुरू होती. मार्च ते ऑक्टोबर या कालावधीत एकूण 379 अर्ज सादर करण्यात आले आहे.

अशी आहे प्रणाली -

यासाठी आधी swavlambancard.gov.inया संकेतस्थळावर जावे लागते. येथे रजिस्टर नावाच्या पर्यायावर वलीक करून आपली सर्व माहिती भरावी लागते. त्यानंतर हा अर्ज घेऊन जिल्हा रुग्णालयाच्या दिव्यांग विभागात जावे लागते. दिव्यांगांच्या तपासणीसाठी बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस ठेवण्यात आला आहेत. यादिवशी दिव्यांग लोकांची डॉक्टरांकडून तपासणी केली जाते. त्यांच्या दिव्यांगतेचे आकलन करण्यासाठी संबंधित प्रामाणित चाचणी केंद्रात ही तपासणी केली जाते. त्यानुसार अपंगत्वाचे निदान केले जाते. यानंतर याचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना दिले जाते.

हेही वाचा - कोरेगाव-भीमा : शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाच्या अभिवादनासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रण

ABOUT THE AUTHOR

...view details