महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा भडका; आज 492 रुग्णांची नोंद, दोघांचा मृत्यू - चंद्रपूर कोरोना न्यूज

चंद्रपूर जिल्ह्यात आज ४९२ कोरोनाबाधित आढळले असून दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, 259 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 29 हजार 863 वर पोहोचली आहे.

corona patients reported in chandrapur ,  corona patients chandrapur ,  chandrapur corona update ,  chandrapur corona death ,  चंद्रपूर कोरोना अपडेट ,  चंद्रपूर कोरोना न्यूज,   चंद्रपूर कोरोना मृत्यू
कोरोना

By

Published : Apr 6, 2021, 7:44 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात मागील २४ तासांत 492 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. 259 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 29 हजार 863 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 26 हजार 412 झाली आहे. सध्या 3009 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 85 हजार 598 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 51 हजार 801 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत्यू झालेल्यामध्ये जीवती येथील 61 वर्षीय पुरूष व उर्जानगर, चंद्रपूर 43 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 442 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 402, तेलंगणा 1, बुलडाणा 1, गडचिरोली 20, यवतमाळ 16, भंडारा 1 आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. 492 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 159, चंद्रपूर तालुका 54, बल्लारपूर 27, भद्रावती 103, ब्रम्हपुरी 27, नागभिड 20, सिंदेवाही पाच, मूल 11, सावली दोन, गोंडपिपरी दोन, राजूरा सहा, चिमूर 18, वरोरा 27, कोरपना 22, जीवती एक व इतर ठिकाणच्या आठ रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा. तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
हेही वाचा -आरोग्यमंत्र्यांची अचानक मालेगावला भेट; सामान्य रुग्णालयासह महापालिकेच्या रुग्णालयांची केली पाहणी

ABOUT THE AUTHOR

...view details