महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुदर्शन निमकरांचा भाजपमध्ये प्रवेश

जूरा विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादीला मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. मात्र आघाडीचा जागा वाटपात राजूरा विधानसभेची उमेदवारी काँग्रेसच्या वाट्याला गेली. या प्रकाराने नाराज झालेल्या राष्ट्रवादीचा काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला

निमकर भाजपवाशी

By

Published : Oct 17, 2019, 11:44 PM IST


चंद्रपूर - जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला एकही उमेदवारी दिली नाही, यामुळे नाराजी व्यक्त करीत भाजपवासी होण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार सूदर्शन निमकर यांनी दिले होते. आज ( गुरुवार )बल्हारपूर येथे झालेल्या जाहीर सभेत नितीन गडकरींचा उपस्थितीत निमकरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. निमकर भाजपवासी झाल्याने राजूरा मतदारसंघात राष्ट्रवादीला मोठी खिंडार पडल्याची चर्चा आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत निमकरांचे हे चौथे पक्षांत्तर ठरले आहे.

जिल्हात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एकही जागा आली नाही. राजूरा विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादीला मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. मात्र आघाडीचा जागा वाटपात राजूरा विधानसभेची उमेदवारी काँग्रेसच्या वाट्याला गेली. या प्रकाराने नाराज झालेल्या राष्ट्रवादीचा काही कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्व पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत येत्या काही दिवसात भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते.

राजूरा येथे होणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेत निमकर भाजपवासी होणार अशी चर्चा होती. मात्र आज बल्हारपूर येथे झालेल्या सभेत ना.गडकरी यांच्या उपस्थितीत निमकरांनी भाजप प्रवेश केला. निमकर हे १९९९ ते २00४ या कालावधीत कॉंग्रेसचे आमदार होते. त्‍यानंतर २०१४ची विधानसभा निवडणूक त्‍यांनी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसकडून लढविली होती. देशात नरेंद्र मोदी, अमीत शाह, नितीन गडकरी यांच्‍या नेतृत्‍वात विकासाचे नवे पर्व सुरू आहे. राज्‍यात देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वातील सरकारने राज्‍याला आघाडीवर नेले आहे. चंद्रपूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात जिल्‍ह्यात अभूतपूर्व असा विकास अनुभवला आहे. त्‍यामुळे भारतीय जनता पार्टीत आपण प्रवेश घेतला .पुढील काळात भाजपाचे संघटनकार्य या राजूरा विधानसभा क्षेत्रात अधिक बळकट करीत जनसामान्‍यांपर्यंत भाजपचे विचार पोहचविण्‍याचे काम करणार असल्‍याचे निमकर म्हणाले.

यावेळी मंचावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, चंदनसिंह चंदेल, माजी आमदार जैनुद्दीन जव्‍हेरी, आमदार अॅड. संजय धोटे, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष हरीश शर्मा, जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे आदींची प्रामुख्‍याने उपस्‍थीती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details