चंद्रपूर :राज्यात ओला दुष्काळ जाहीर ( Demand to declare wet drought ) करा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक ( NCP aggressive ) झाली आहे. आज माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ही मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना अजूनही शासनाकडून नुकसान भरपाई ( Tanpure accusation against Shinde government ) देण्यात आली नाही असा आरोप यावेळी तनपुरे यांनी केला.
चंद्रपुरात राष्ट्रवादीचा मोर्चा अतिवृष्टीने जनजिवन विस्कळीत -चंद्रपूर जिल्ह्यात पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. चिमूर तालुक्यातील अनेक भागांना याचा फटका बसला. यापूर्वी राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार ( Leader of Opposition Ajit Pawar ) यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला होता. यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी देखील चिमूर येथे पाहणी केली. यावेळी तालुक्यात जुलै महिन्यात आलेल्या अतिवृष्टीने जनजिवन विस्कळीत झाले. शेतपिकासह घरांची पडझड, अन्नधान्याची नासाळी झाली. मात्र, मदत काही मिळाली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चाचा धसका घेऊन कालपासून पाच हजार रुपयांचा धनादेश वाटप सुरु करण्यात आले. जिल्ह्याचा संपर्कमंत्री नसलो, तरी भिसी तहसील तथा चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी विधानसभेत पोहचविणार, असे आश्वासन माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चात दिले.
हेही वाचा -Ujjwal Nikam : उज्वल निकम यांची 'नंदनवन'वरती मुख्यमंत्र्यांशी भेट; म्हणाले, 'कितीही युक्तीवाद केला तरी...'
अतिवृष्टीने नागरिकांचे प्रंचड नुकसान -चिमूर विधानसभा क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीने नागरिकांचे प्रंचड नुकसान ( Damage due to heavy rainfall ) झाले आहे. पूरग्रस्तांना नुकसानभरपाई, चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी, भिसी तालुक्याची मागणी, ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी, मोराबर्डीचे अपूर्ण काम पूर्ण करावे, अन्नधान्यावरील जिएसटी ( GST ) मागे घ्यावी, घरगुती गॅसची किंमत कमी करावी इत्यादीसह सतरा मागण्यांकरिता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बैलबंडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला संबोधित करताना, माजी मंत्री आमदार तनपुरे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना या अडचणीच्या काळात राज्याच्या मंत्रिमंडळाची गरज आहे. चुकीच्या पद्धतीने आलेली सरकार जास्त काळ टिकणार नाही, असे भाकीत केले.
मुख्यमंत्र्यांना निवेदन -जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके, जिल्हा सरचिटणीस अरविंद रेवतकर, रमेश कराडे, जिल्हा उपाध्यक्ष श्रीनिवास शेरकी, चिमूर विधानसभा अध्यक्ष रघुनाथ बोरकर, यांच्यासह भिसी येथील विठ्ठल-रुख्माई मंदिरात दर्शन घेऊन पूरग्रस्त महालगाव काळू गावाची पाहणी करण्यात आली. तसेच पूरग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. बैलबंडी मोर्चाची सुरवात बालाजी मंदिर येथून झाली. उपविभागीय अधिकारी कार्यालयापुढे मोर्चा धडकल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
हेही वाचा -Sanjay Raut : 'बाळासाहेबांनी शिकवलं रडायचं नाही, सत्यासाठी...'; संजय राऊतांचे विरोधकांना पत्र