महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 27, 2021, 10:41 PM IST

ETV Bharat / state

कोरोनाची भिती झुगारून हौशी घेताहेत मुक्ताई धबधब्याचा आंनद

पावसाळ्यात ४५ फुटावरून कोसळणारा धबधब्याच्या धारा अंगावर घेऊन आंनद लुटायला शनिवार व रविवार या सुट्यांच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्यात तरुणांची संख्या सर्वाधिक असते. धबधब्या जवळून नागमोडी वळण घेऊन जाणारी गुहा, धबधब्यावर सूर्यकिरण पडल्याने दिसणारे विलोभनीय इंद्रधनुष्याचा आंनद पर्यटक घेतात.

मुक्ताई धबधबा
मुक्ताई धबधबा

चिमूर (चंद्रपूर) - चिमूर मुख्यालयापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुक्ताई मंदीर परिसरातील निसर्ग सौंदर्य आणि पावसाळ्यात ४५ फुटावरून कोसळणारा धबधब्याचे आकर्षण विदर्भातील निसर्गप्रेमींना आहे. या परिसरात कोरोना महामारीमुळे मागील पावसाळ्यात बंदी घालण्यात आली होती. मात्र यावर्षी कोरोनाची सर्व भिती झुगारून हजारो हौशी निसर्गप्रेमी धबधब्याचा आणि निसर्ग सौंदर्याचा आंनद लुटत आहेत.

कोरोनाची भिती झुगारून हौशी घेताहेत मुक्ताई धबधब्याचा आंनद

आदिवासी माना जमातीचे आराध्य -

चिमूर तालुक्यात जंगल निसर्ग सौंदर्य तथा जैव विविधता विपुल प्रमाणात आहे. यात रामदेगी (संघारामगिरी) तथा मुक्ताई देवस्थान परीसरातील धबधबा पूर्व विदर्भातील पर्यटकांना भुरळ घालतो. मात्र वन विभागाच्या हेकेखोरपणामुळे रामदेगीचे दर्शन क्लीष्ट झाले आहे. त्यामूळे जंगल व निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्याकरीता सुलभ असे ठिकाण तथा पावसाळ्यात हिरवेगार वन व उंचावरूण बरसणारा धबधब्याकडे सगळ्यांची धाव आहे. सात बहिणी डोंगराच्या कुशीत असलेले आदीवासी माना जमातीचे आराध्य व जागृत देवस्थान म्हणून विरागंणा मुक्ताई मंदीर प्रसिद्ध आहे.

देवस्थान समितीच्या स्वंयसेवकांची देखरेख -

पावसाळ्यात ४५ फुटावरून कोसळणारा धबधब्याच्या धारा अंगावर घेऊन आंनद लुटायला शनिवार व रविवार या सुट्यांच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्यात तरुणांची संख्या सर्वाधिक असते. धबधब्या जवळून नागमोडी वळण घेऊन जाणारी गुहा, धबधब्यावर सूर्यकिरण पडल्याने दिसणारे विलोभनीय इंद्रधनुष्याचा आंनद पर्यटक घेतात. माना जमातीकरिता पवित्र असलेल्या मंदीर व परिसरात युवक-युवती कडून चुकीचे कृत्य होऊ नये, परीसरात प्लॉस्टिकचा कचरा होऊ नये, वाहने व्यवस्थित ठेवावी याकरिता विरांगणा मुक्ताई देवस्थान समितीच्या स्वयंसेवकांचा जागता पहारा व देखरेख असते.

ABOUT THE AUTHOR

...view details