चंद्रपूर - शहरातील बाबूपेठच्या सिटी शाळा परिसरात माकडांनी दहशत पसरवली आहे. या परिसरातील माकडांनी आतापर्यंत सात ते आठ जणांना चावा घेऊन जखमी केले आहे.
बाबूपेठ परिसरात माकडांची दहशत, सात जणांना घेतला चावा - माकडांची दहशत
शहरातील बाबूपेठच्या सिटी शाळा परिसरात माकडांची दहशत पसरली असून, परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना लक्ष्य केले असून सात ते आठ जणांना चावा घेतलाआहे.
उन्हाळ्यात माकडांचा कळपच्या कळप नागरी वसतीकडे येतो. या कळपाने बाबूपेठ वॉर्डातील सिटी शाळेजवळ उत्पात माजविला आहे. या माकडांनी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना लक्ष्य केले असून सात ते आठ जणांना चावा घेतला आहे. त्यामुळे येथील नागरिक माकडांच्या दहशतीत असून घराच्या बाहेर पडण्यास देखील घाबरत आहेत. लहान मुलांना तर कटाक्षाने घराच्या आत ठेवण्यात येत आहे.
माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून माकडांना नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.